सुनीला रत्नाकर थेरगांवकर - लेख सूची

‘भोगले जे दुःख त्याला’ एक आगळे आत्मचरित्र

आजपर्यंत अनेक उपेक्षितांनी आत्मचरित्र लिहून आपले अंतरंग उघड केले आहे. समाजाकडून, कुटुंबीयांकडून विशेषतः सासरच्या, झालेल्या अनन्वित शारीरिक, मानसिक अत्याचारांच्या अमानुष कहाण्या आपल्या वाचनात आल्या आहेत. मनात वाटलेली कटुता, क्षोभ, प्रचंड भावनिक खळबळ व मरणप्राय उद्विग्नता या सर्व भावभावनांना वाट करून देण्याचे उत्तम साधन म्हणजे आत्मचरित्र. समाजापर्यंत पोचण्याचा समाजमान्य मार्ग. ही प्रत्येक व्यक्तीची मानसिक गरज आहे. …

मनाचिये गुंती

आधुनिक युगात स्थलकालाबाधित अशी जर कोणती गोष्ट असेल, जी प्रत्येक मनुष्यप्राण्याला कमीजास्त प्रमाणांत छळत असते, ती म्हणजे काळजी किंवा चिंता. Anxiety (चिंता) हा जर एखाद्या व्यक्तीचा स्थायीभाव झाला तर, तिचे दूरगामी शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, अनेक व्याधींचा उद्भव करून त्या व्यक्तीचे जीवन यातनामय कस्न टाकू शकतात. ‘जी चित्ताला जाळते ती चिंता’ हे सर्वश्रुत आहेच. सामान्य …

निरामय जीवनासाठी

सीने में जलन, आँख में तुफान सा क्यों है? इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? आजकाल आजूबाजूला पाहिले तर आपल्या संपर्कात येणारे नातेवाईक जवळचे दूरचे, मित्रमैत्रिणी, सहकारी, कामाला येणारी बाई, दुकानदार, बँका ऑफिसेसमधील कर्मचारी, विद्यार्थी, इतकेच काय पण प्रवासात होणारी घडीभराची संगत, अशा सर्व व्यक्ती ‘सीने में जलन’ व ‘आँखों में तूफान’ …